भालचंद्र काळीकर - लेख सूची

‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’

आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत …

जुने ते सोने (?)

पुराणमित्येव न साधु सर्वम् (जुने ते सर्वच चांगले असते असे नाही.) असे कविकुलगुरु कालिदास दोन हजार वर्षांपूर्वी सांगून गेला आहे. परंतु आमच्या पुराणप्रिय समाजाच्या काही ते पचनी पडले नाही. उलट एखादी गोष्ट जितकी जुनी तितकी ह्या समाजाला जास्त प्रिय असते. काळाची पुटे चढून ती जेवढी अंधुक होईल तेवढी ती आम्हाला अधिक आकर्षक वाटते. निराधार परंपरांवर …

माझे मनोगत……

भारतीय वैदिक तत्त्वज्ञानात सहा प्रमुख दर्शने मानली आहेत. ती अशी : (१) सांख्य, (२) वैषेशिक, (३) पूर्वमीमांसा, (४) न्याय, (५) योग आणि (६)वेदान्त (उत्तरमीमांसा हा वेदान्ताचाच भाग आहे.) त्यांपैकी पहिली तीन संपूर्णपणे निरीश्वरवादी असून त्यांचे प्रणेते अनुक्रमे कपिल महामुनी, महर्षी कणाद, आणि आचार्य जेमिनी हे तिघेही महान तत्त्ववेत्ते आणि विचारवंत म्हणून गणले जातात. न्याय आणि …

ईश्वर – एक मुक्त चिंतन

“आस्तिक विरुद्ध नास्तिक” असा एक कायमचा घोळ समाजाच्या वैचारिक विश्वात चालू असतो. हा घोळ आस्तिकांनी घातला आहे. नास्तिकांची विचारसरणी सुस्पष्ट असते. निरीक्षण-परीक्षण-प्रत्यक्ष प्रयोग-गणितीय पडताळणी ह्या वैज्ञानिक प्रक्रियेतून निष्पन्न झालेले सत्य विवेकाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत असल्यामुळे नास्तिकांच्या मनात कुठलाही संदेह नसतो. आस्तिकांजवळ मात्र काल्पनिक गृहीतकांशिवाय कोणतेच साधन नसते. निराधार परंपरांवर डोळे मिटून श्रद्धा ठेवीत ते अंधारात …